MATH TRICKS (numbers )
गणितातील महत्वपूर्ण तथ्य ,शॉर्ट कट्स ट्रिक
नैसर्गिक संख्या (NATURAL NUMBER ) -N
- 1 , 2 , 3 , 4 …….या सर्व संख्याना नैसर्गिक संख्या म्हणतात .
सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे
2.पूर्ण संख्या (Whole number )
- 0 ,1 , 2 , 3 या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात
- सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आहे
3.पूर्णांक संख्या
- धन संख्या ,ऋण संख्या व शून्य या संख्याना पूर्णांक संख्या म्हणतात
उदा --३,-२,-१,०,१,२,३….
4. सम संख्या
- ज्या संख्येच्या एककस्थानी ०,२,४,६,८ हे अंक असतात त्यांना सम संख्या म्हणतात
- सर्व सम संख्याना २ ने नि:शेष भाग जातो
- क्रमागत समसंख्यात 2 चा फरक असतो
- कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्या असते
- कोणत्याही सम संख्येत एक मिळविल्यास किंवा एक वजा केल्यास विषम संख्या मिळते
5.विषम संख्या
- ज्या संखेच्या एकक स्थानी 1,3,5,7, नऊ हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात उदा -३३५,२२७
- क्रमागत विषम संख्यात 2 चा फरक असतो
- कोणत्याही विषम संख्येत एक मिळविल्यास किंवा एक वजा केल्यास सम संख्या मिळते
6.मूळ संख्या
- ज्या संख्येस एक व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात उदा -२,३,५,७,११,१३ . इ .
- सर्वात लहान मूळ संख्या -०२
- एकमेव सममूळ संख्या -०२
- एक हि मूळ संख्या नाही
- ०१ ते १०० पर्यंत एकूण मूळ संख्या -२५
७) संयुक्त संख्या
- नैसर्गीक संख्येतून एक व मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत
- एकूण संयुक्त संख्या -७४
- १ हि संयुक्त संख्या नाही
- सर्वात लहान संयुक्त संख्या -४
८. त्रिकोणी संख्या
- दोन क्रमागत नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात
- सर्वात लहान त्रिकोणी संख्या -१
- १ ते १०० पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या -१२
९. चौरस संख्या
- पूर्ण वर्ग संख्याना चौरस संख्या म्हणतात उदा -४,१६,२५,इत्यादी
१०. सहमुळं संख्या
- दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नाही अशा संख्यांना सहमुळं संख्या म्हणतात
- उदा -( ९ . १० ) ( ५ ,२७ )
No comments:
Post a Comment
dont paste any spam link here