Menu


मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ 

१. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले
जास्त फायद्याची आशा धरल्याने थोडासा होणारा फायदाही जातो अन शेवटी नुकसान  होते.
२.आळी मिळी गुपचिळी
"आपले गुपित रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून शांत बसणे."
३.अग माझे बायले, सारे तुला बाह्यले
"बायकोच्या म्हणण्याप्रमाणे वागला, तिला कितीही दिले ,तरी  ती समाधानी राहत नाही."
४. संगोसंगी वडाला वांगी
"एखादी विशिष्ट गोष्ट एकाने दुसरयाला , दुसरयाने तिसरयाला सांगताना शेवटी मूळ गोष्ट बाजूला राहून तिसरेच काहीतरी निर्माण होणे."
५. अंगापेक्षा बोंगा जड
"आहे त्या परिस्थिती पेक्षा जास्त मोठेपणाने वागणे ."
६. एकाने गाय मारली म्हणून दुसरयाने वासरू मारू नये
"समोरच्या माणसाने आपल्याशी बेजबाबदार वर्तन केल्यास आपणही तसेच अनुकरण करू नये."

७. अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज.
"गरजवंताला अक्कल नसते."
८. अति शहाणा त्याचा बैल रिकामा
"अति शहाणपणा दाखवायला गेल्यास कोणतेही काम व्यवस्थित होत नाही ..शेवटी नुकसान होते ."
९. अंथरूण पाहून पाय पसरावेत
"स्वतः च्या मिळकतीच्या प्रमाणात खर्च करावा"
१०.अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं
"भविष्याचा विचार न करता काम करत रहाणे"
११.आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे
माणसाला आपल्या सर्व गोष्टी चांगल्या वाटतात पण दुसऱ्याच्या गोष्टीत त्याला चुका दिसतात.
१२. गुरूची विद्या गुरूस फळली - भोंवली
"लोकांस फसविण्याची युक्ति ज्याला शिकविली त्यानेंच याला ( गुरूला ) फसविलें."
१३. कोरड्याबरोबर ओले जळते
अपराध्याबरोबर सामान्यांना दोष दिला जातो.
१४.आपलेच दात अन आपलेच ओठ
दोषी ठरविणारे आपणच अन ज्यांना दोषी ठरविले तेही आपलेच.
१५. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
कष्ट घेतल्या शिवाय मोठेपणा मिळत नाही.
१६. डोगंर पोखरून उंदीर काढणे
कष्टाच्या मानाने अगदीच कमी मोबदला मिळणे.
१७. ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला
संगतीने दुसऱ्यातील गुण येण्याऐवजी दुर्गुण जास्त घेतले जातात .
१८. तण खाई धन
क्षुल्लक गोष्टी पुढे घात करतात.
१९. तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे
आलेल्या संधीचा फायदा घेणे.
२०. अग अग म्हशी, मला कुठे नेशी?
"स्वतःला हवी असलेली गोष्ट, जी दुसर्याच्या आग्रहामुळे करावी लागत आहे असे दाखवणे."
२१.हातघाई वर येणे
"उतावीळ होणे."
२२. हातात कंकण बांधणे
"निश्चय करणे."
२३. हातपाय हलविणे
"काहीतरी मिळवण्यासाठी  प्रयत्न करणे."
२४. हातापाया पडणे
"विनंती करणे"
२५. हव्यास धरणे
"उत्कट इच्छा धरणे"
२६. हुतात्मा होणे
"उच्च ध्येयायासाठी बलिदान करणे."
२७. हायसे वाटणे
"समाधान वाटणे."
२८. अंग टाकणे
"अगदी कृश होणे."
२९. अंग धरणे
"बाळसे धरणे."
३०.उरात धडकी भरणे
"अतिशय घाबरणे ."
३१. उरी फुटणे
"मनाला सहन न होण्यासारखा धक्का बसणे."
३२. हात ओला करणे
"जेवायला घालणे"
३३. हात पसरणे
"याचना करणे"
३४. हात गगनाला पोहोचणे
"गर्व होणे."
३५. हात टाकणे
"मारणे"
३६. हात मारणे
" फायदा करून घेणे."
३७. हात चालणे
"पैसा मिळणे"
३८. हात देणे
" मदत करणे."
३९. हरभऱ्याच्या झाडावर चढविणे
"खोटी स्तुती करणे."
४०. हात आखडता घेणे
"देण्याचे प्रमाण कमी करणे."
४१. हातपाय गाळणे
"नाउमेद होणे."
४२. हाडे खिळखिळी करणे
"अतिशय त्रास देणे."
४३. सोक्षमोक्ष लावणे
"शेवट करणे."
४४. संगनमत करणे
"एकमेकांशी बेत ठरविणे"
४५. हातावर तुरी देणे
"फसवून पळून जाणे"
४६.हातावर शीर घेणे
"जीवावर उदार होणे"
४७.योगक्षेम चालविणे
"चरितार्थ चालविणे"
४८. रक्ताचे पाणी करणे
"अतिशय कष्ट करणे."
४९. रामराम ठोकणे
"कायमचा निरोप घेणे"
५०. रामायण लावणे
"लांबड लावणे"
५१. राम नसणे
"अर्थ नसणे"
५२. रेवडी उडविणे
"फजिती करणे"
५३ रंग दिसणे
"संभव असणे"
५४. लाचार होणे
"निरुपाय होऊन शरण जाणे."
५५. लांडगेतोड करणे
"शत्रूवर तुटून पडणे."
५६. वाचनाला जागणे
"दिलेला शब्द पाळणे."
५७. वाण पडणे
"कमी पडणे."
५८. वाघाचे कातडे पांघरणे
"मुद्दाम ढोंग करणे."
५९. वेसन घालणे
"मर्यादा घालणे"
६०. वेड लागणे
"नाद लागणे"
६१. वेड घेऊन पेडगावास जाणे
"मुद्दामहुन  ढोंग करणे."
६२. वनवास भोगणे
"हालअपेष्टा भोगणे"
६३. वाटेला जाणे
"खोडी काढणे."
६४. विकोपास जाणे
"अतिरेक होणे, मर्यादेबाहेत जाणे."
६५. विधिनिषेध न बाळगणे
"कसलाच धरबंद नसणे."
६६. विरंगुळा मिळणे
"मन रमणे, समाधान वाटणे."
६७. शब्द खाली पडू न देणे
"मनाप्रमाणे वागणे."
६८. शंभर वर्षे भरणे
"नाशाची वेळ येणे."
६९. शिकस्त करणे
"खूप प्रयत्न करणे."
७०. शोभा होणे
"फजिती करणे."
७१. सही फिरणे
"प्रतिकूल वेळ येणे."
७२. सळो कि पळो करून सोडणे
"अतिशय त्रास देणे."
७३. सतीचे वाण घेणे
"अतिशय अवघड गोष्ट करण्याची जबाबदारी स्वीकारणे."
७४. साखर पेरणे
"गोड गोड बोलून आपलेसे करण्याचा प्रयत्न करणे."
७५. तोंडात साखर घालणे
"आनंदाने तोंड गोड करणे."





No comments:

Post a Comment

dont paste any spam link here