Menu


MATH TRICKS LCM /HCF

MATH TRICKS LCM /HCF
लसावि / मसावि 
  • लसावि ( LCM )

→  लसावि म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य 
→  2 व  4 ने 8 या लहान संख्येला भाग जातो म्हणून 8 ला 2 व 4 चा लसावि असे   
      म्हणतात 

⇒  लसावि काढायची  शॉर्ट पद्धत  ( SHORT TRICK )


उदा -      1 )   5 व 11 या संख्येचा लसावि काढा . 

उत्तर :     मूळ संख्याचा लसावि त्यांच्या गुणाकाराइतका असतो 
                       म्हणून  5 X  11  = 55 
                       लसावि = 55

   2 )  3 ,6  ,12  ,36   चा लसावि काढा . 

        उत्तर :   दिलेल्या गटातील सर्वात मोठ्या संख्येला जर उर्वरित सर्व संख्यांनी
  भाग जात   असेल तर ती मोठी संख्या लसावि असते
           
         म्हणून  वरील गटात  36 ला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो म्हणून वरील
गटाचा 36 हा   लसावि आहे 

        3 ) 5 , 15, 20, 30 चा लसावि काढा . 

         उत्तर :  वरील गटात  30 ला 5 व 15 ने भाग जातो परंतु 20 ने जात नाही
मग अशा वेळेस 30 ची दुप्पट करून   बघावी  : ३० X २ = 60 आता 60 ला
२० ने भाग जातो म्हणून वरील गटाचा 60 हा लसावि आहे 

        4 ) 4 ,12 ,17 ,24   चा लसावि काढा . 
          उत्तर :  वरील गटात  24 ला 4 व 12 ने भाग जातो परंतु 17 ने जात नाही
मग अशा वेळेस 24 ची दुप्पट करून  बघावी  : 24 X २ = 48 आता 48 ला
17 ने भाग जात नाही मग आता 17 X  24 करावे  17 X  24 = 408
म्हणून वरील गटाचा 408 हा लसावि आहे 
  • मसावि (HCF)

 ⇉  कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावि 1 असतो 
      ⇉ मूळ  संख्यांचा मसावि 1  असतो 
      ⇉सह मूळ  संख्यांचा मसावि  1  असतो 

⇒  मसावि काढायची  शॉर्ट पद्धत  ( SHORT TRICK )

 उदा  :
1 ) 6 , 12 , 18  चा मसावि काढा 

उत्तर ; दिलेल्या गटातील सर्वात लहान संख्येने इतर सर्व मोठ्या संख्याला
पूर्ण भाग जात असेल तर ती लहान संख्या त्या गटाचा मसावि असते 
वरील गटात 6 ने बाकी संख्याना पूर्ण भाग जातो म्हणून वरील गटाचा 6 हा मसावि आहे 

२ ) 8, 20, 28, 44 चा लसावि काढा  

उत्तर ;  सर्वात लहान संख्येने इतर सर्व संख्याना भाग जात नसेल
तेव्हा लहान संख्येचा मोठा विभाजक घेऊन पहा त्याने जर सर्व संख्याना
पूर्ण भाग जात असेल तर तोच मसावि असतो 

वरील गटात 8 या लहान संख्येने इतर सर्व संख्याना भाग जात नाही
म्हणून 8 चा मोठा विभाजक 4 हा घेऊन बघूया आता 4 ने इत्तर
सर्व संख्याना भाग जातो म्हणून वरील गटाचा 4 हा मसावि आहे 


THANKS FOR VISIT US .......

No comments:

Post a Comment

dont paste any spam link here